शुभांगी फासेला एनएनएस कार्यगौरव पुरस्कार

0

जळगाव। येथील अ.र.भा.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बीएससीच्या तृतीय वर्गात शिक्षण घेत असलेली शुभांगी विठ्ठल फासे हीस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ स्तरीय दिला जाणारा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

शुभांगीने मागील वर्षी आव्हान या राज्यस्तरीय शिबीरात देखील पुरस्कार मिळाला आहे. यावर्षीचा महाविद्यालयीन उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून देखील तीला सन्मानित करण्यात आला आहे. या यशाबद्दल चेअरमन संजय गरुड, प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील, प्रा.अमर जावळे, एनएनएस कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी.गव्हारे, प्रा.व्ही.एन.पतंगे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.