शेंदुर्णीत दाम्पत्याचे विषप्राशन ; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर !

Couple poisoned in field in Shendurni : Wife dies : Husband critical पहूर : पती व पत्नीने स्वतः च्या शेतात विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली असून या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर आहे. विनोद अरूण गायकवाड-पाटील (35) व भारती विनोद पाटील (30, रा. श्रीकृष्ण नगर) अशी दाम्प्त्याची नावे आहेत. या दाम्प्त्याच्या पश्चात दोन मुले आहेत.

शेतात गेल्यानंतर विष प्राशन
विनोद व भारती हे शनिवारी दुपारी शेतात गेले होते. दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास दोघांनी विष प्राशन केले. हा प्रकार परिसरातील शेतकर्‍यांच्या लक्षात आला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी भारती मृतावस्थेत तर विनोद हा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने पाचोरा येथे हलविण्यात आले.

घातपाताचा माहेरच्यांनी केला आरोप
पती आपणास मारहाण करीत असल्याचा फोन भारती हिने शनिवारी दुपारी 12 वाजता आईला केला होता. आपल्या मुलीचा सासरच्यांनीच घातपात केल्याचा आरोप भारतीचे वडील सुरेश पाटील व आई सुनीता पाटील (रा. सारनेर ता. सिल्लोड) यांनी पोलीस उपनिरीक्षक एस.पी.बनसोड यांच्याशी बोलताना केल्यानंतर पोलिसांनी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.