शेंदुर्णी। येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या खाजगी प्राथमिक शाळेत गुरुवारी प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. पहिल्याच दिवशी सर्व मुलांचे गुलाबपुष्फ देवून स्वागत करण्यात आले.
देवरामदादा बारी रा.दे.निकम, प्रकाश देशमुख, भारतीताई जगताप यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड खाऊ घालण्यात आले.