शेंदुर्णी। आंतरराष्ट्रीय योग दिवस योगासनाची विविध प्रात्याक्षीके करुन साजरा करण्यात आला योग प्रशिक्षक प्रा.एस.जी.डेहरकर व उपप्राचार्य प्रा.आर.जी. पाटील यांनी विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षक व कमचारी यांना योगासनांचे प्रात्यक्षिक शिक्षण देत त्याचे होणारे फायदे व महत्व विषद केली. प्राचार्य डॉ वासुदेव पाटील यांनी स्वतः सहभाग घेत काही आसने व त्यांची फिजियो थेरेपिक माहिती दिली. एज्यू. सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा घेण्यात आली.
मान्यवरांकडून गौरव
याप्रसंगी उमविच्या रासेयो विभागाकडून उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार घोषीत झाल्याप्रित्यर्थ महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी शुभांगी फासे हीचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सचिवपदी निवड झाल्या प्रित्यर्थ जेष्ठ संचालक सागर मलजी जैन यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच महाविदयालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक एस.जे.साळुखे यांना उमविकडून पीएच.डी.पदवी मिळाल्याप्रित्यर्थ त्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध सुविधांसह झाली सहविचार सभा
पुढील वर्षी महाविद्यालय नॅकच्या तीसर्या सायकलला सामोरे जात आहे. महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता वाढ आणि पायाभूत सुविधांसंदर्भात केलेल्या कामांचा लेखाजोखा प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी सहविचार सभेपुढे मांडला त्यात महाविद्यालयात विभाग निहाय इंटरकॉम सुविधा, इन विल्ड साऊंड पोडीअम, कार्यालय कक्ष नुतनीकरण, ठिकठिकाणी विद्युत स्टेबीलायझर्स, अतिरिक्त दोन कंपन्याचे हायस्पीड इंटरनेट काही परीसरात गरजेनुसार वायफाय सुविधा, चलनद्वारा सुट सुटीत प्रवेश प्रकीया, शिस्तीसाठी सर्वाना गणवेश, आधार क्रमांक मतदान कार्ड इपिक क्रमांक, पॅन नंबर एकाच ठिकाणी असलेले ओळखपत्र सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची महिती दिली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉ.एस.जे.साळुखे, डॉ.प्रशांत देशमुख, शुभांगी बारी, प्रा.पी.जे.सोनवणे, सचिव सागर मलजी जैन यांनी मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन डॉ.एस.डब्ल्यू.भोळे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.एन. एस.सावळे, उपप्राचार्य प्रा.आर.जी.पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.