शेंदुर्णी येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम

0

शेंदुर्णी । येथील सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरे झाले. यामध्ये स्वच्छता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, असे अनेक संदेश बहारदार नृत्य, नाटिका, पोवाडे यांच्या माध्यमातून चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेमधील विदयार्थ्यांचे पालक असलेल्या महिलाकडूनच करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत सदस्या कमलाताई गुजर, ज्योती सूर्यवंशी, ज्योती पाटील, शुभांगी पायघन, अरुण सोहनी, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, शिला पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते.

उपस्थितांकडून टाळ्यांची दाद
कार्यक्रमात विविध गाण्यावर नृत्य अविष्कार चिमुकल्यांनी सादर करून उपस्थितांची टाळ्यांची दाद मिळवली. यामध्ये शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर पोवाडाही विद्यार्थीनीनी सादर केला डान्स कोरोग्राफर अजय भोई, समाधान निकम, अक्षय उसे, यांनी विद्यार्थींचे डान्स कोरोग्राफर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जान्हवी सूर्यवंशी व मीरा इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केले.