शेंदुर्णी । आर्ट ऑफ लिव्हिंग बंगलोरतर्फे येथील पारस जैन मंगल कार्यालयात 11 ते 18 जुलै दरम्यान युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबीरास राज्यातील विविध भागांमधुन युवक युवती सहभागी झाले होते. आठ दिवस निवासी शिबीरामधुन युवकांना सक्षम आणि निरोगी बनविण्या सोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांची ओळख करुन देवून आठ दिवस विविध योगा प्राणायम ध्यान आणि विषयामधुन आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला. तसेच ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले अनुभव
शिबीराच्या समारोप प्रसंगी युवक व युवतींनी आलेले अनुभव कथन केले. याप्रसंगी पालक उपस्थित होते. शिबीरार्थीना वरीष्ठ प्रशिक्षक माधव गवई बुलढाणा यांनी दिक्षा दिली. शिबीरामध्ये सेवा देण्यासाठी विविध भागांमधुन युवाचार्य आले होते. शिबीराचे आयोजन दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी पारस जैन पतसंस्थे तर्फे पारस मंगल कार्यालय, साईखुशी अॅक्वा तर्फे पिण्याचे पाणी तर संजु महाराज तर्फे भोजन देवून सहकार्य करण्यात आले.