शेंदुर्णी । सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ.चारुदत्त साने यांचा 13 वा पुण्यस्मरण दिनानिमित्त वैदयकिय रोग निदान व उपचार शिबीर घेण्यात आले. या शिबीरासाठी डॉ. विकास रत्नपारखी, डॉ. शितल अग्रवाल, डॉ. नितीन धांडे, डॉ. चेतन चौधरी, डॉ. कल्पक चारूदत्त साने, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. योगेश भोगावकर, डॉ. दिग्वीजय एकबोटे, डॉ. पुजा गजहंस, डॉ. अनिल पवार यांनी रूग्णांची तपासणी केली.
शिबीरात 547 रूग्णांची तपासणी
या शिबीर 547 रूग्णांनी तपासणी करून उपचार करण्यात आले व औषधे देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटनानंतर राजेंद्र भारूडे, डॉ. विकास रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात पं.स.सदस्य डॉ. किरण सुर्यवंशी, संस्था सचिव कांतीलाल ललवाणी, टी.के.पाटील, कडोबा सुर्यवंशी, जगदीश गुजाळे, अशोक औटे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, मुख्याध्यापीका शिलाबाई पाटील, मांगीलाल रांका, जेष्ट पत्रकार अशोक जैन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण डॉ. कौमुदी साने यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केले. सुत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद सरोद यांनी केले.