शेंदुर्णी। येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे आवारात शाखा व्यवस्थापक यांनी जागा उपलब्ध करुन दिल्याने येथील साई खुशी एकवातर्फे गावकरी व बाहेर गावातील लोकांसाठी 1 रुपयात 1 लिटर व 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्यामुळे आज अधिकृतपणे पाणी एटीएमचे उद्घाटन गरुड महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी.के.अग्रवाल, बॉलिवूड गायक पी गणेश, स्टेट बँक शाखाधिकारी पगारे साहेब,बुलढाणा अर्बन शेंदुर्णी शाखा व्यवस्थापक प्रशांत चौधरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ विजयानंद कुलकर्णी, श्रीकृष्ण चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अहिरे, उपाध्यक्ष, ऍड. देवेंद्र पारळकर ,डॉ. निलम अग्रवाल,सुनील शिंपी, संजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. वॉटर एटीएममुळे अल्प दरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांना आरोग्यासाठी दिलासा मिळणार असल्याने उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.