शेंदुर्णी । येथील संत सावता महाराज विकास मंडळ व माळी समाज बांधवांतर्फे शनिवारी 22 रोजी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आरती व पुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संत कडोबा महाराज मंदिरात संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे भिका माधव माळी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा व आरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आलेर. दत्त मंदिरात माळी समाजाचे वतीने अन्नदान करण्यात आले.
रात्री ह.भ.प.सुभाष महाराज (भालोदकर) यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प.कडोबा महाराज माळी, त्र्यंबक माळी , रघुनाथ माळी, हरीभाऊ माळी, हिरा माळी, भिका माळी, नथ्थु माळी, वारकरी संप्रदाय मंडळी मंडळी उपस्थित होते.