शेंदूर्णीत भाजपकडून धार्मिकस्थळी ध्वनिक्षेपकाने प्रचार

0

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आक्षेप; शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक
शेंदुर्णी – भाजपाने नगरपंचायत निवडणूकिच्या प्रचाराचा नारळासह शुभारंभ ग्रामदेवत त्रिविक्रम मंदिरात केला. मात्र त्याच ठिकाणी जाहीर राजकीय सभेचे आयोजन करीत ध्वनीप्रेशक लावून मंदिरात सभा लावण्यात घेण्यात आली. त्यात विविध आश्वासन देण्यात आले यास राष्ट्रवादीने आक्षेप घेत आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करीत प्रचारासाठी धार्मिकस्थळाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्याबाबतचे आक्षेपचे पत्र त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला दिले.

कारवाई न झाल्यास आदोलनाचा इशारा
मंत्री महोदय यांनी ‘काहीही करा पण निवडणूका जिंका ‘या शब्दाला त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘मंदिरात जाहीर सभा घेत राजकीय सभा घेण्यात आली, हे योग्य नाही.याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. काहीही करा पन निवडणूका जिंका’ या मंत्री महोदय च्या वक्तव्य पारदर्शक निवडणूक प्रक्रियेत बाधक असल्याने या बाबत जिल्हाधिकारी यांना कळविले आहे, असेही संजय गरूड यांनी सांगितले.