सहकार अधिकारी डी.व्ही.पाटील यांनी केली निवड
शेंदूर्णी – येथील उत्तरभाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष कै.प्रल्हाद आनंदा गोढरी यांचे मागील महिन्यात अचानक निधन झाल्याने चेअरमनपद रिक्त झाले होते. दरम्यान काल चेअरमनपदी संस्थेचे संचालक सुभाष चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यालयात सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी डी.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ही निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपाध्यक्ष पार्वता शुक्ला, संचालक नारायण कोळी, राजेंद्र राजपूत, कडोबा सुर्यवंशी, अर्जुन बारी, संजय बारी, लक्ष्मण गुजर, दीपक जोहरे, सुभद्रा कुणबी, आशाबाई बारी यांची उपस्थिती होती. गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, बापू चौधरी, सुरेश बारी, सुनील शिनकर, अंबादास पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमनपदी सुभाष चौधरी यांचा सत्कार केला. संस्थेचे सचिव राजू लहू खर्चाने, लिपिक विनोद इंगळे, सेल्समन अशोक चौधरी, सेवक विकास पाटील यांनी कामकाज पहिले.