नवी दिल्ली- सोमवारी स्टोक मार्केटमध्ये कमजोरी दिसून आली. २०१८ च्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनची आर्थिक घसरण झाल्याचा परिणाम आशियाई बाजारात दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर पण दिसून येत आहे. सोमवारी कामकाज सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली. सेन्सेक्स ५० अंकांनी खाली आले तर निफ्टी ११ हजारच्या खाली आली. सद्य स्थितीत सेन्सेक्स 36476 तर निफ्टी 30 10989 अंकावर पोहोचले आहे. मिडकैप आणि स्मॉलकैप शेयरमध्ये घसरण झाली आहे.
इंफोसिसमध्ये ३ टक्के वाढ
एप्रिल-च्या क्वार्टर मध्ये आयटी कंपनी इंफोसिसचे शेयर ३ टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2019 च्या पहिल्या तिमाहीत इंफोसिसचा प्रॉफिट 2.11 टक्के कमी होऊन 3612 कोटी रुपए होता. तर आर्थिक वर्ष २०१७ मध्ये चौथी तिमाहीत इंफोसिसचा नफा 3,690 कोटी होता. इंफोसिसने 1 वर 1 बोनस शेयर देण्याची घोषणा केली आहे.