मुंबई : मोहरमच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर बाजार वेगानेच सुरू झाला. सेन्सेक्स उसळी घेईल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र दुपारच्यावेळी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. दुपारी सेन्सेक्समध्ये दीडहजार अंकांनी घसरण झाली तर निफ्टीतही ३५० अंकाची घसरण झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली.
सेन्सेक्समध्ये दीडहजारची घसरण झाली. येस बँक, सन फार्मासह इंडिया बुल्स हाऊसिंग यांचे शेअरही घसरले. त्यामुळे शेअर बाजारात एकच खळबळ उडाली. सकाळी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली होती. सेन्सेक्स १७२ अंकांने वाढून ३७३९१.६ अंकावर पोहोचला तर निफ्टीही ६९ ने वाढत ११३२३ वर पोहोचला होता. मात्र दुपार होता होता सेन्सेक्समध्ये कमालीची घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्सचा चार्ट व्ही शेपमध्ये आला. मोहरमच्या सुट्टीमुळे गुरुवारी शेअर बाजार बंद होता. त्यामुळे आज बाजार सुरू होताच चांगली सुरुवात झाली होती.दुपारच्या नंतर कमालीची घसरण पाहायला मिळाली.