– गुंतवणूकीचे तसेच विकास व अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारे उत्तम साधन
तळेगाव स्टेशन : सध्या शेअर मार्केट हे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणारे केंद्र बनले आहे. शेअरमार्केटला केवळ सट्टा न समजता एक उत्तम गुंतवणूकीचे तसेच विकास व अर्थव्यवस्थेला पाठबळ देणारे उत्तम साधन आहे असा दृष्ठीकोन ठेवा.असे प्रतिपादन मुंबई शेअरमार्केटचे युनुस कुरेशी यांनी तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयात केले.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे वतीने आयोजित केलेल्या तीन दिवशीय व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात कुरेशी बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ,एस.के.मलघे होते. याप्रसंगी शेअरमार्केट मधील तज्ञ नेहा पटनी, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.व्ही.अडसूळ, डॉ.एस.के.सानप,प्रा.डी.पी.काकडे,प्रा.एम.व्ही. खांदवे,डॉ.अर्चना जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शेअर मार्केट विषयी अज्ञान
कुरेशी यांनी मुंबई शेअरमार्केट बाबत सुरुवाती पासून ते आतापर्यंतची माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केली. सेन्सेक्स व निफ्टी यामधील फरकही स्पष्ट करुन सांगितला.केवळ अज्ञान व भीतीपोटी भारतीय लोक शेअर्स मध्ये गुंतवणूक म्हणजे धोक्यात टाकल्याचे समजतात आणि एफ.डी,विमा,पोस्ट यामध्ये गुंतवतात.म्हणून भारतीय युवक शेअरमार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीपासून वंचित राहात आहेत.भारतीय अर्थव्यवस्था ही बलाढ्य अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.याचे श्रेय शेअरमार्केटला जाते असे कुरेशी यांनी सांगितले.
विविध संकल्पनांवर प्रकाश
नेहा पटनी यांनी म्युच्युअल फंड व शेअर मार्केट यातील फरक स्पष्ट केला.तसेच इक्विटीफंड,इंडेक्स फंड,सेक्टर फंड,बँलन्स फंड, प्राँपर्टी,इन्व्हेसमेंट,एफ.डी.आणि सेफ अकाऊंट या संकल्पनांवर प्रकाश टाकला. प्रा.अडसूळ यांनी मनोगतातून सांगितले की शेअरमार्केट माध्यमातून मूलभूत उद्योगासाठी वाढून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन रोजगार निर्मिती वाढेल व शेअरधारकांनाही चांगला परतावा मिळेल.प्रास्ताविक व स्वागत डॉ.अर्चना जाधव यांनी केले. आभार प्रा.के.व्ही .अडसूळ यांनी मानले.