रोहा – कर्जत तालुक्यातील नेरळ येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील शेकापचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची सभा संपन्न झाली. यावेळी पक्षाच्या विविध समित्यांमध्ये काम करण्यासाठी इच्छूक कार्यकर्त्यांची नावे घेण्यात आली.