भुसावळ : तालुक्यातील शिंदी येथील देवबा पाटील या शेतकर्याने कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या वारस असलेल्या पत्नी द्रोपदाबाई देवबा पाटील यांना शासनाच्या निधीतून एक लाख रुपये मदतीचा धनादेश आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी देण्यात आला. प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार विशाल नाईकवडे, नायब तहसीलदार संजय तायडे आदींची उपस्थिती होती.