शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय : आ.कुणाल पाटील

0

धुळे । राज्यात विदर्भ-मराठवाड्यानंतर खान्देशातही शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक वाढत आहे. खान्देशातील शेतकरी सुध्दा गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जात आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रासह खान्देशातील शेतकर्‍यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे.विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेत सहभागी झालेले धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी संघर्ष यात्रेत पत्रकारांशी चर्चा करताना केली.

संघर्ष यात्रेत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची घेतल्या भेटी
पहिल्या दिवशी नागपूरपासून सुरु झालेल्या या संघर्ष यात्रेने चंद्रपूर मार्गे यवतमाळपर्यंत एकूण 350 कि.मी.प्रवास एकाच दिवसात पूर्ण केला. यादरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट, शेतकर्यांशी थेट संवाद आणि जाहीर सभा घेण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगावातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना विरोधी पक्षाच्यावतीने एकूण 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. संघर्ष यात्रेतील सर्व आमदार व कार्यकर्त्यांनी सेवाग्राम येथील बापूकुटी व पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमास भेट दिली. विरोधी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांसह एकूण 90 आमदार संघर्ष यात्रेत सहभागी झाले.

संघर्ष यात्रेत यांनी घेतला सहभाग
संघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरपीआयचे जोंगेंद्र कवाडे, सपाचे अबु आझमी, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आदी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. यात्रेत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, शिरपूरचे आ.कशिराम पावरा, साक्रीचे आ.डी.एस.अहिरे यांच्यासह विरोधी पक्षाचे नेत्याची सहभागी झाले आहेत.