शेतकरी सुखावला : शहादा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

0

शहादा- शहरासह तालुक्यात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकरी वर्गासह नागरिकामध्ये समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पावसाच्या आगमनाची वाट पाहत होता. आठवड्याभरापुर्वी शहादा शहरासह परीसरात पाऊसाची नोंद झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणी करून ठेवली होती व पुढील पावसाची कुतुहलाने वाट पाहात होते पण पाऊस येण्याचे चिन्हच दिसत नव्हते. रामपुर , मंदाणा , तर्‍हाडी असलोद ,वैजाली काथर्दा , सह परीसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजेचा दरम्यान पावसाचे वातावरण तयार होवून पाऊसाचे आगमन झाले. बर्‍याच दिवसांपासून वातावरण उष्ण झाले होते. झालेल्या पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणीची वेळ येते की काय या विचाराने परिसरातील शेतकरी चिंतातुर होता परंतु शनिवारच्या पावसाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.परीसरातील नद्या पाण्याने भरुन वहात होत्या. मंदाणा येथील मंदाकिनी नदीचे नयन रम्य दृश्य परिसरातील नागरीकांना टिपण्याचा मोह टाळता आला नाही. पाण्याचा प्रवाह मोठा होता. तर्‍हाडी येथील जंगलातुन आलेला नाल्यात देखील पाणीच पाणी होते. शहरातील गोमाइ नदी दुधडी भरुन वाहात होती . परीसरात सर्वत्र पाऊस आल्याने नागरीक व शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . शिवाय जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होइल. खाली गेलेले बोअरवेलची पाण्याची पातळी देखील वाढेल व मृत अवस्थेत असलेले बोअरवेल देखील जिवंत होतील, अशी आहे.