शेतकर्यांना ठिबक संचात 25 टक्क्यांची सूट
पत्रकार परीषदेत श्रीराम पाटील : नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना मदतीसाठी श्रीराम ठिबक कंपनीचा पुढाकार
रावेर : रावेर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग प्रचंड हवालदील झाला असताना नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मदतीला उद्योजक श्रीराम पाटील सरसावले आहे. श्रीराम ठिबक कंपनीतर्फे नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून रावेर तालुक्यातील बळीराजांना ठिबक संचाच्या किमतीत 25 टके सूट देण्यात येणार असल्याचे श्रीराम ठिबकचे सर्वेसर्वा श्रीराम पाटील यांनी सांगितले.
हेक्टरी लाखाची मदत द्यावी
रावेर शहरातील श्रीराम फाऊंडेशनच्या कार्यालयात केळी बाधीत शेतकर्यांच्या मदतीसाठी पत्रकार परीषद घेण्यात आली. यावेळी पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यातील शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश सरकारप्रमाणे हेक्टरी एक लाख व पडलेले केळीचे बाग साप करण्यासाठी दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी उद्योजक श्रीराम पाटील यांनी केली. यावेळी डॉ.सुरेश पाटील, अनिल पाटील, सोपान पाटील, राजेंद्र पाटील, घनश्याम पाटील आदी उपस्थित होते.
शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी कृषिमंत्र्याना भेटणार
रावेर तालुक्यात वारंवार होणारी नैसर्गिक आपत्ती व शेतकर्यांच्या व्यथा तसेच केळी पिकांचे झालेल्या नुकसानी संदर्भात आम्ही लवकरच नुकसानग्रस्त शेतक-यांची एक टीम घेऊन महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे जाणार असून त्यांची भेट घेणार आहोत व त्यांना रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानी संदर्भात भरपाई देण्याचे निवदेन देणार असल्याचे उद्योजक श्रीराम पाटील म्हणाले.
बाधीत शेतकर्यांना करणार मदत
पाटील पुढे म्हणाले की, कोणतेही संविधानीक पद नाही तरी रावेर तालुक्यातील शेतकर्यांसाठी सामाजिक दायित्व म्हणून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना ठिबक संचामध्ये 25 टक्के सूट देणार आहे. यापूर्वीदेखील आम्ही अशी मदत बाधीत शेतकर्यांना केली होती व सुमारे 50 वर शेतकर्यांनी याचा लाभ घेतला होता. आतादेखील बाधीत शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रावेर येथील कार्यालयात घनश्याम पाटील राजू पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन उद्योजक श्रीराम पाटील यांनी केले आहे.