जळगाव। जिल्ह्यातील बागायतदारांनी खरीप पेरणीची पूर्वमशागत सुरू झाली केली आहे. बागायतदार शेतकर्यांकडून कापसाच्या बियाण्याची मागणी होत आहे. मागणीनुसार बाजारपेठेत बागायती कापसाचे बियाणे दाखल झाले आहे. यावर्षीच्या हंगामासाठी जिल्ह्याला 23 लाख 44 हजार कापूस बियाण्याच्या पाकिटांची गरज असल्याचा कृषी विभागाचा अंदाज वर्तविला आहे.
कंपन्याकडून 22 हजार कापूस बियाणे पाकीटे उपलब्ध झाली असून ही पाकीटे 1 मे रोजी उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित बियाणे 15 मे पर्यंत उपलब्ध होतील. असे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले. एकूण 23 लाख कापूस बिटी बियाणे पाकिटांची कंपन्यांनी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. हेक्टरी बियाणे पाकिटांची गरज लक्षात घेऊन कृषी विभागाने बियाण्याचे नियोजन केले आहे. कापसासह मका, सोयाबीन, तूर, ज्वारी या बियाण्याच्या पुरवठ्याचे महाबीजसह इतर खासगी कंपन्यांकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण लाख 66 हजार हेक्टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे. त्यात जामनेर आणि चाळीसगाव तालुक्यात लाख 20 हजार हेक्टर, अमळनेर 40 हजार 500 हेक्टर, चोपड्यात 34 हजार 250 हेक्टर तर जळगाव तालुक्यात 31 हजार 810 हेक्टरवर कापूस लागवड होईल.