शहादा । प्रकाशा येथे सदगुरू दगडू धर्मशाळेच्या प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटना नंदुरबार जिल्हा उत्तर महाराष्ट्राची 1 ली भव्य उस परिषद खासदार राजू शेट्टी यांचा अध्यक्षाखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी परिसरातून हजारो शेतकरी बहुसंख्य बंधू भगिनी व मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सभेत खासदार राजू शेट्टी आव्हान केले कि शेतकरी परिषद घेत आहोत सरकारची झोप उघडण्याची मोठी धोक्याची घंटा आहे.
शेतकर्यांची जास्त परीक्षा घेऊ नका अंत बघू नका मानसिकता बिघडली तर उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही आता यापुढे शेतकर्यांनी उसाचा भावासाठी सभा ,आंदोलन करू नका. कारखान्याला उस च देऊ नका. कारखानदार यांना तुमची किंमत कळू दया. मोदींना आपली किंमत द्यावी लागेल. आपली ऊस परिषद ची त्यांना किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी सभेत सांगितली. तसेच पूढे बोलतांना ते म्हणाले की, कारखान्याचा व व बिलिंगला वजन काट्यावर ,साखर गोडाऊन मध्यें सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा. याचा अहवाल वेळोवेळी देणे गरजेचे आहे. गुजरात मध्ये उसाला भरघोस भाव शेतकर्यांना देतात मग येथे घोडं अडलाय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. रविकांत तुपकट यांनी या सभेत म्हणाले की, दबाव आणणार्या तुमची ताकद दाखवा सभेत आलेले सर्व जण स्वतःचे खर्च ने आले आहेत. दारूचा बाटलीवर बायांची नावं देतात मंत्र्या ना लाज कशी वाटत नाही मंत्र्याची बायकोचे नावं का टाकत नाही? मोठी शरमेची गोष्ट आहे. शेतकर्यांना नोट बंदीचा नावाखाली व जनधन योजनांचा बँकेत नवंखाते प्रत्येकाला खाते काढायला लावले आहे. सर्वांचे पैशे थकवलेत आशाच प्रकारे पैसा देशात परत आणणार, सर्व सामन्यांना कर्ज माफी देऊ, दोन लाख लोकांना,तरुणांना नोकर्या देऊ, शेतकर्याचा मालाला किमती भाव देऊ, असे वादे फक्त फोल ठरले आहेत, असे त्यांनी सांगितले.