शेतकर्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा

0

जळगाव : शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावेत यासाठी भूमिपूत्र संघटनेतर्फे अनोखा अर्धनग्न मोर्चा शिवतीर्थ मैदानापासून बुधवारी भर उन्हात दुपारी 11.30 वाजता निघाला. या मोर्चांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी सहभागी झाले होते. यात एरंडोल, पाचोरा, जामनेर, धुळे, नंदुरबार, नगर येथील काही शेतकरी सहभागी झाले होते. हा मोर्चा स्टेडीयम चौक, नवीन बसस्थानक, स्वांतत्र चौक मार्गांने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चांमध्ये संघटनेचे अध्यक्ष किरण पाटील, वजयसिंग परदेशी, रवी पवार, नारायण पाटील, शुभम पाटील, दीपक पाटील, ऋतीक पाटील, अण्णा राजपूत, गौरव राजपूत आदी सहभागी झाले.

मागील नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी यांना कजर्माफी व इतर विषयांचे निवेदन दिले. नंतर डिसेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले, पण त्याची दखल घेतली नाही, अशी तक्रार शेतकर्‍यांनी केली. आपण राजे आहात. आपण आम्हाला सुखी करा, अशी मागणी या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे केली. आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढे आंदोलन तीव्र करू. ट्रॅक्टरमध्ये माती आणून ती शहरातील मुख्य मार्ग, महामार्गावर टाकू. चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला.