शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत बिकट

0

शहादा। शे तकरी हा देशाचा पोशिंदा आहे.तो भिक मागत नाही,तो भिकारी नाही उलट शेतकरीच देशाला भिक देतो.आज शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरांच्या मालाला हमी भाव मिळत नाही. सरकारची उदासिनता त्यास कारणीभूत आहे. शेतकर्‍याचा विश्वास घात करण्या-या राज्य व केंद्र सरकारला वठणीवर आणण्यासाठी आदोलन तीव्र केले जाईल. त्याचा सात बारा कोरा करण्यासाठी संघर्ष याञा सुरूच राहणार असुन18 जुलै रोजी ही याञा दिल्ली येथे धडकणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी लोणखेडा येथे आयोजित सभेत बोलताना सांगितले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांची लोणखेडा येथे जाहिर शेतकर्‍याची जाहिर सभा झाली. यावेळी संघटनेचे खासदार व्हि एम सिंग ( यु पी) भारतीय किसान आंदोलनाचे समन्वयक योगेद्र यादव, माजी आमदार डॉ सुनिलम( एम.पी)आविकसहा(प.बं),अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष रूलदुसिगं,(पजाबं) तेलगनाचे चंद्रशेखरजी,जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी,सातपुडा कारखाना चेअरमन दिपक पाटील, नर्मदा आंदोलनाच्या मेधा पाटकर,प्रतिभा शिंदे,वसंत पाटील,मुकेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार शेट्टी म्हणाले शेतकर्‍याना खर्चाच्या दिडपट मालाला भाव मिळायला पाहिजे व दैशातील सर्वच शेतकर्‍याना सातबारा कोरा झाला पाहिजे.

मानसौद येथून बारा राज्यातुन यात्रा
या दोन मागण्यांसाठी किसान मुक्ती याञेचे उद्दिष्ठ आहे. सहा जुलैला मध्यप्रदेशमधील मानसौद येथून बारा राज्यातुन संघर्ष याञा निघाली असुन अठरा जुलै रोजी दिल्ली येथे याञा धडकणार आहे.शेतकर्‍याच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे.पावसाळी अधिवेशनात देखील संघर्ष सभेचा अहवाल मांडणार आहे.शेतकर्‍याच्या मालाला ठोस हमीभाव मिळत नाही. देशाला पोसणार्‍या शेतकरानाच वार्‍यावर सोडुन अल्पशी कर्जमाफी करून सरकारने शेतकराची चेष्टा केली आहे. लाखोचे कर्ज बुडविण्यार्‍याना अभय आणि जगाचा पैशिदा असण्यार्‍या शेतकरानांच वैठिस धरण्याचा प्रकार शेतकराची क्रुर थट्टा आहे.मोठी आश्वासने देउन शेतकर्‍याच्या जिवावर निवडुन आलेल्या केंद्र व राज्य सरकारने शेतकरांची उपेक्षा केली आहे.पंधरा लाखाचा सातबारा गहान ठेऊन तूटपुंजे कर्ज देणारे या शासना विरूद्धात शेतकराचा सात बारा कोरा होईपर्यत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला.

शेतकर्‍यांच्या एकजुटीशिवाय न्याय नाही
मेघा पाटकर म्हणाल्या शेतकरी एकजुट होत नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही.शेतकर्‍यानी संघटितपणे संघर्ष केला तर सरकारही वठणीवर येईल. अखिल भारतीय किसान सभेचे जोगेद्र यादव म्हणाले की संघर्ष याञेला एक जुन पासून सुरूवात झाल्याने शेतकर्‍यामध्ये जागृती निर्माण झाली. सरकार शेतकरांचे प्रश्न समजुन घेत नाही म्हणून शेतकरानी संघटीतपणे लढा दिल्यास किसान मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही.सभेत मानसैद (एमपी) येथिल शेतकरी आंदोलनात शाहिद झालेल्या शेतकर्‍याप्रती श्रद्धाजंली देण्यात आली. सभेत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तामिळनाडू,पं.बंगाल,मध्यप्रदेश,तेलंगणा,आंध्रप्रदेश,हरियाणा,महाराष्ट्र,ओडिशा,उत्तरप्रदेश,गुजरात,राजस्थान आदि राज्याचे प्रतिनिधी देखील सभेत उपस्थित होते.