जळगाव । सततचा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकर्यांवर कर्जबाजारी होवून बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने काँग्रेस पक्षातर्फे संघर्ष यात्रा काढून सातत्याने कर्जमाफीची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यात सरकारतर्फे कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी ही कर्जमाफी फसवी असून सरसकट संपूर्ण कर्जमाफीपर्यंत काँग्रेसचा लढा सुरु राहणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ.उल्हास पाटील व जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी शुक्रवार 14 जुलै रोजी आयोजित केलेल्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत बोलतांना सांगितले. कर्जमाफीच्या निर्णयात कायम संदीग्धता ठेवण्यात आली असून शेतकर्यांच्या व्यथा मांडण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून माझी कर्जमाफी झाली, तुमची झाली का? हे अभियान काँग्रेसतर्फे राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या अभियानाव्दारे गावोगावी शेतकरी वर्गात वस्तुस्थिती मांडण्यात येवून जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार वर्षातील कर्जमाफी फक्त 5 हजार कोटी
गतकाळात आघाडी शासनातर्फे 2008 मध्ये शेतकर्यांना कोणतीही अट न घातला सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु या शासनाने कर्जमाफी देतांना अनेक निर्णय बदलवून तत्वत: सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्यात शासनाने शेतकर्यांना 10 हजारांची उचल देतांना देखील जाचक अटी घातल्या. या अटींना काँग्रेस पक्षाततर्फे विरोधी केल्यानंतर काही अटी शिथील केल्या. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी 24 जून रोजी शेतकरी सन्मान योजना जाहीर करत कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या शासनाने दिलेले आकडे हे फसवे असून 2012 ते 16 या चार वर्षाच्या कालावधीतील कर्जमाफी 34 हजार कोटीची नसून 5 हजार कोटीची आहे. तर 89 लाख शेतकर्यांऐवजी केवळ 15 लाखापेक्षा कमी शेतकर्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. भाजपा सरकाने केलेली कर्जमाफी ही केवळ मृगजळ असून 10 हजारांची उचल देण्याची घोषणा करुन सुध्दा कोणत्याही जिल्ह बँकांनी आदेश न अजून मिळाला नाही.
बैठकीस यांची होती उपस्थिती
शिखर व एनएससी बँकेत निधीची मागणी न केल्यामुळे आजपर्यंत कोणत्याही शेतकर्याला पेरणीपूर्व मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी प्रदेश सरचिटणीस प्रदीप पवार, डी.जी.पाटील, पराग पाटील, देवेंद्र मराठे, शाम तायडे, गोरख पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, साहेबराव पाटील, संजय पाटील, शेख इस्माईल, डी.पी.पाटील, अशोक खलाणे आदी उपस्थित होते. काँग्रेसभवनात झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी प्रथमच जिल्हाभरातून विविध जि.प.गटातून सक्रीय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणाावर उपस्थिती दिसली.