अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही : योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रसंगी सत्याग्रहाची गरज
फैजपूर (निलेश पाटील)- आज राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. अनेक संकटांना त्याला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी शेतीत नवनवीन प्रयोगाशिवाय पर्याय नाही व त्यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्याचे उत्पन्न 2022 पर्यंत कसे दुप्पट होईल यासाठी सात कलमी योजना तयार केली असून त्याची ज्योत या फैजपूर पावन भूमीत देशातील पहिल्या अटल महाकृषी कार्यशाळेच्या माध्यमातून पेटविण्यात आली आहे. ती ज्योत शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्यासाठी सत्याग्रह करावा लागेल तेव्हाच शेतकर्यांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी शासन शेतकर्यांच्या पाठिशी उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. सोमवारी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून आयोजित अटल महाकृषी कार्यशाळेचे आयोजन येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबरशेठ नारखेडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते.यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार उन्मेष पाटील, आमदार चंद्रकात सोनवणे, आमदार चंदू पटेल, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परीषद अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेगावकर, माजी माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, यावल नगराध्यक्ष सुरेखा कोळी, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, माजी सभापती हिरालाल चौधरी, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विलास चौधरी, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत यासह मान्यवर उपस्थित होते.