जळगाव । राज्यातील शेतकर्यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय तीन वेळा घेतला आणि चारवेळेस घोषणा केली. कर्जमाफीसाठी दोन महिन्याचा अवधी मागीतला परंतु त्याचा अद्यापर्यर्ंत एकाही शेतकर्याला मिळाला नाही. प्रत्येक शेतकर्याला प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेले 10 हजार रूपये दिले नाही. जनता व मीडियांच्या समोर शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन देवून वारंवार बदलले जाणारे निर्णय, जाचक अटी व निकष यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांमध्ये कर्जमाफीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कर्जमाफीचे निकष पालकमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकर्यांना हमी भाव मिळत नसल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी सुकाणू समीतीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अमळनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकर्यांनी आंदोलन करण्यात आले, पाचोरा शहरातील जारगांव चौफुलीवर चक्काजाम आंदोलन सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मेहुणबारे पोलीसांनी चोख बदोबस्त ठेवला होता. तर भडगाव येथे पारोळा चौकात आंदोलन करून भडगाव तालुका दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
अमळनेर कृउबासमोर आंदोलन
अमळनेर । शहरातील महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सकाळी 10 वाजेच्यासुमार कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्ता बंद करून शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून लगेच सोडण्यात आले. यावेळी अमृतराव महाजन, ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण शिंदे, विश्वास पाटील, चंद्रकांत माळी, विठ्ठल बडगुजर, नरेंद्र पाटील, संभाजी पाटील, प्रताप धनगर,शिवाजी पाटील, भगवान पाटील, भरत पाटील, विकास पाटील, समाधान पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
शेतकर्यांच्या या आहेत मागण्या
शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजाबणी करावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज मिळावे, शेतकर्यांना पेंशन योजना लागु करावी, दुधाला चांगला भाव मिळावा, शेतीसाठी मोफत वीजपुरवठा करावा, सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, या मागण्यासाठी शेतकरी आंदोलने करीत आहेत. आंदोलनाना यश येवुन शासनाने कर्जमाफी केली असली तरी त्याचा लाभ शेतकर्यांना मिळत नाही तत्वता कर्जमाफी केल्याने त्यात जाचक अटी ठेवुन शासनाने एकप्रकारे शेतकर्यांची फसवणूक करून थट्टा केली आहे म्हणून शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला असुन शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी 14 ऑगस्ट 2017 रोजी जिल्ह्यातील किसान क्रांती सुकाणु समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देवळी येथे कर्जमाफीच्या घोषणा
चाळीसगाव । शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा यासह सात मागण्यासाठी व सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीत बदल करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागण्यासाठी किसान क्रांती सुकाणु समितीच्या वतीने तालुक्यातील देवळी येथे सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मेहुणबारे पोलीसांनी चोख बदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात किसान क्रांती सुकाणु समितीचे विवेक रणदिवे, रयत सेनेचे गणेश पवार, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, शरद राजपूत व लोकसंघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, देवळीचे जितेंद्र सूर्यवंशी, नवल सूर्यवंशी, आबासाहेब रणदिवे, धनंजय काकळीज, प्रिप्री बु येथील प्रदीप पाटील, भास्कर पाटील, पिलखोडचे जगन्नाथ माळी, किशोर महाजन, पाटणागावचे रघुनाथ ठाकरे, दडपिंप्रीचे कैलास राजपुत, सुवर्णसिग राजपूत या नागरीकांसह आडगाव, चिचखेडे, डोण,प्रिप्राळा येथील शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकर्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून वाहतूक रोखून धरत पाचशे शेतकर्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी मिळावी आमचा सातबारा कोरा करावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणी करावी यासाठी शेतकर्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दडपिंप्री, आडगाव, टाकळी, पिलखोड, शिरसगाव, ब्राह्मणसेवगे, देवळी या परिसरातील असंख्य मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पाचोरा येथे जारगांव चौफुलीवर रास्ता रोको
पाचोरा । शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी नावाखाली तोंडाला पाणे पुसले असुन या फसव्या धोरणा विरूद्ध शेतकरी सुकाणू समिती व किसान क्रांती च्या माध्यमातून पाचोरा शहरातील जारगांव चौफुलीवर चक्काजाम आंदोलन सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी येथील जारगांव चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘एकच नारा सातबारा कोरा, सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, नागपूरचा पोपट काय म्हणतो कर्ज माफी नाय म्हणतो, शेतकर्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे‘ आदी घोषणांनी दणाणले. दोन किमीपर्यंत रहदारी चारही बाजूंनी ठप्प झाली होती. यावेळी किसान क्रांती व शेतकरी सुकाणू समितीचे सचिन सोमवंशी, अॅड. अविनाश भालेराव, विनोद अहिरे, मुकेश तुपे, गणेश पाटील, संजय पाटील, जिभाऊ शिंदे, अॅड. मंगेश पाटील, अॅड. आबा पाटील, अॅड. प्रवीण पाटील, जिभाऊ पाटील, सुनील पाटील, भाऊसाहेब पाटील, तात्या नागणे, गुरुनाथ भालेराव, इब्राहिम शेख, वाल्मिक पाटील, प्रवीण पाटील, पप्पू पाटील, रवि देवरे, सागर पाटील, आकाश पाटील, जावेद मुल्ला, पप्पू महाजन, नंदु सुर्यवंशी, दिलीप पाटील, विजय सुर्यवंशी, उखा पाटील, अहिरे, बंटी भोई, भिकन गोसावी, विनायक पाटील, भुषण पाटील, दिवाकर पाटील, महेश पाटील, कुणाल शिंदे, श्रावण मोरे, शशीकांत मोरे, आकाश पाटील, विठ्ठल शिवणकर, मिलिंद भुसारी, अनिल मराठे, अनिल येवले आदी सह बहुसंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. डिवायएसपी केशव पातोंड, पो.नि श्यामकांत सोमवंशी, पो.हे.कॉ.नितीन सुर्यवंशी, प्रकाश पाटील, पो.कॉ.प्रकाश पाटील आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता
भडगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
भडगाव। शहरातील पारोळा चौफुली येथे शेतकरी सुकाणु समीतीतर्फे विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करा तसेच भडगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्यासह सन 2015/16 दुष्काळी अनुदान त्वरीत मिळावे. विज बिल माफ करावे, शैक्षणिक शुल्क माफ करुन शिक्षवृत्ती देण्यात यावी आदी मागण्या मान्य करुन शासनाने त्वरीत न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी विकास पाटील, व्ही.एस.पाटील, योजनाताई पाटील, दिपक पाटील, प्रदीप देसले, दत्तात्रय पवार, संभाजी भोसले, रविद्र महाजन आदीनी सहभाग नोंदविला.