मुंबई । दोन दिवसात शेतकर्यांच्या संपाचा निर्णय न झाल्यास ठाण्यातील दूधविक्रेत्यांची ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्था शेतकर्याच्या संपात सहभागी होणार आहे. ठाण्यातील दूधविक्रेत्यानी संपात उडी घेतल्यास आजपासून ठाणेकरांना दूध तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. यामुळे लहानमुले आणि ठाणेकरा पर्यंत शेतकरी संपाची झळ लागणार असल्याचे चित्र आहे.
शेतकरी यांचा संप असल्याने जिल्ह्यातून येणारे दूध वाहतुकीवर परिणाम होणार आहे. गुरुवारी दुधाचा पुरवठा सुरळीत होता. मात्र दूध विक्रेतेही शेतकरी संपात सहभागी होणार असल्याने ठाणेकरांनी आगाऊ जास्त दूध विकत घेतले आहे. मात्र शुक्रवार पासून ठाण्यात दुधाचा तुटवडा जाणवू लागणार आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना दुधासाठी धावपळ करावी लागणार आहे. ठाणे शहरात 550 ते 600 दूधविक्रेते ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्था आहेत. या दूध विरेट्यानं दुधाचा मुबलक पुरवठा झाल्यास ते दूध विकतील. मात्र दोन दिवसात शेतकरी यांचा संप मिटला नाही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र दूधविक्रेते शतकर्यांच्या संपत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ठाण्यात दूध मिळविणे कठीण होणार आहे. या संपाच्या दरम्यान दूध विक्रेते ग्राहकांना वेठीस धरून जर जास्त किमतीत दूध विकताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच असे दुकानदार दूध जास्त किमतीत विकताना आढळले तर संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्थाचे सहसचिव पांडुरंग चोडणकर यांनी सांगितले