भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणे संस्थेतर्फे आयोजन
पिंपरी : भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणे संस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर आणि द जळगाव पीपल्स को. ऑप. बँक यांच्या सहकार्याने जळगाव व पुणे जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, शेतीसाठी काम करणार्या संघटना, विषयतज्ञ, शास्रज्ञ यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ येथील प्रभाकर सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. शेतकर्यांच्या सक्षमीकारणाबाबत यावेळी विचार मंथन करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या समस्या सोडवता येऊ शकतील व शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती व शेतकरी समृद्धीकारणाबाबत मार्गदर्शन केले. रविद्र चौधरी यांनी एल.सी.सी.आय.ए. ही संस्था करीत असलेले कार्य याविषयी मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रात शेतकर्यांचे संघटन असावे याबाबत एकमत झाले. संघटनेचे स्वरूप, ध्येय, धोरण, नियम आदी निश्चित करण्याबाबत आगामी काळात बैठक घेऊन आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
यांची लाभली उपस्थिती
जळगावमधील चर्चासत्रासाठी पुणे येथून मंडळाचे अध्यक्ष व लेवा भ्रातृमंडळ कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे, पुरुषोत्तम पिंपळे, लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, ग्लोबल नॉलेज पुणे अध्यक्ष सतीश फिरके, नाशिक येथून सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद महाजन, मलकापूर येथून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेचे प्रणेते व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पाटील, शेतकरी उपक्रमा संदर्भात केंद्र शासनाचे समन्वयक अमित नाफडे, जळगाव येथून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरुडे, किशोर ढाके, एलआयसीचे पदाधिकारी नितीन इंगळे व पुष्कर नेहेते, फ्रुटसेल सोसायटीचे कार्यकर्ते प्रेमराज खडके, भालोद येथून राज्य कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित शेतकरी नारायण चौधरी, गणेश नेहेते, हर्षळ जावळे, शून्य बजेट शेतीचे पुरस्कर्ते विलास नेमाडे, समन्वयक डॉ. प्रशांत फलक, कडू पाटील, ईश्वर लीधुरे आदींची यावेळी उपस्थिती होती. तसेच या चर्चासत्रासाठी कै. शरद जोशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांची आवर्जुन उपस्थिती होती.
आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन
पुरुषोत्तम पिंगळे यांनी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या समस्या सोडवता येऊ शकतील व शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती व शेतकरी समृद्धीकारणाबाबत मार्गदर्शन केले. रविद्र चौधरी यांनी एल.सी.सी.आय.ए. ही संस्था करीत असलेले कार्य याविषयी मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रात शेतकर्यांचे संघटन असावे याबाबत एकमत झाले. संघटनेचे स्वरूप, ध्येय, धोरण, नियम आदी निश्चित करण्याबाबत आगामी काळात बैठक घेऊन आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले. पुरूषोत्तम पाटील यांनी पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमेचे महत्व आणि गरज, उत्पादन वाढीसाठी जीवामृताचे स्थान, पाणी उपलब्धतेनुसार पीक पेरणी आणि नियोजन करण्याबद्दल माहिती दिली. विलास नेमाडे यांनी शुन्य बजेट शेतीबद्दल मार्गदर्शन केले. तर नारायण चौधरी यांनी वडिलधार्या मंडळींकडून तरूणांच्या मनावर शेती फायदेशीर ठरू शकते असे बिंबवले पाहिजे.
शेती सुधारण्यावर चर्चा
राज्यात तसेच देशभरात 100 कोटी शेतकरी व शेतमजुरांची परिस्थिती अत्यंत दयनीय व हलाकीची आहे. शेतकर्यांचे संघटन असावे अशी सर्वांचे एकमत झाले. शेती पिकली तरी तोट्यात आणि नाही पिकली तरी तोट्यात अशी अवस्था शेतकर्यांची आज झालेली आहे. विकास यंत्रणा विविध उपक्रम राबवीत आहे मात्र शेतकर्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नाही. परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिकट होत चालली आहे. शेतकर्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. संघटनेचे स्वरूप ठरविण्यासाठी आगामी बैठक आयोजित करण्यात येईल. त्यासाठी सर्वांनी आर्थिक पाठबळ देण्याचे ठरले आहे.