शेतकर्‍यांना अनुदानास नकार

0

अमळनेर । शेतकर्‍यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेअतर्गत तालुक्यातील कृषी विभागामार्फत संपुर्ण तालुक्यात मागेल त्याला शेततळे खोदकाम सुरू झाले. शासनातर्फे अनुदान मिळणार असल्याने शेततळे खोदण्यासाठी शेतकर्‍यांनीही चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला. तालुक्यातील शिरुड,कावपिप्री,इंद्रापिप्री व जानवे परिसर हा खडकाळ परिसर असल्याने याभागातील शेतकर्‍यांनी शेततळे खोदण्याचे काम सुरू झाले. मात्र 2 ते 3 फुटावर खडक लागल्याने अपूर्णच सोडून देण्यात आले. याबाबत शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी हात वर केले.खडक लागल्याने शेततळे होणार नाही त्यामुळे शेतकर्‍यांना उनदानही मिळणार नाही .दुसरीकडे त्याच्या जमिनीचे ही नुकसान झाले.यामुळे शेतकर्‍यांची पेरणीही वाया गेली. शेतकरी ना इकडा ना तिकडाचा राहिला.अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

दोनशे ते अडीचशे शेतकर्‍यांचे नुकसान
मागेल त्याला शेत तळे या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून तालुक्यात सुमारे 200 ते 250 शेततळे खोदण्यात आले. शेततळ्यांना त्यांचा आकार व खोली नुसार अनुदान देणार होते. बाकी खर्च शेतकर्‍यांनी करायचा होता. त्यामुळे या योजनेला शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला.परंतु तालुक्यातील शिरुड,कावपिप्री,इंद्रापिप्री व जानवे परिसर हा खडकाळ परिसर असल्याने या भागातील सुमारे 5 ते 6 शेततळे हे अपूर्णच खोदून काम बंद केले. फक्त 2 ते 3 फूट खोदून ते काम अपूर्ण सोडल्यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनी वाया जाऊन त्या पेरणी करण्या अयोग्य झाल्या आहेत. अपूर्ण सोडलेल्या शेततळ्यांना कोणत्याही प्रकारे अनुदान नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. पण त्यांच्या जमिनी त्यात अडकल्याने उत्पन्न ही बुडणार आहे. शेततळी पूर्ण करण्यासाठी शासन कोणतेही अनुदान देत नाही. ते शेततळे शेतकर्‍यांनी स्वखर्चातुन पूर्ण करावेत असे सांगितले जात आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांवर अधिकच संकट ओढवले आहे.

शेतकर्‍यांवर आर्थिक संकट
शेतकरी पहिलेच पाऊस पडत नसल्याने चिंतेत आहेत .तर पावसाळा तोंडावर असल्याने आता बियाणे,खातासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलेला आहे. असतांना आता शेत तळे पूर्ण करण्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे .शासनाने ते अपूर्ण राहिलेले शेत तळे पूर्ण करावेत किव्हा कोणत्या तरी योजनेतून ते शेत तळे पूर्ण करावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खडक लागल्याने अपूर्ण शेततळ्यांसाठी शासनाकडून कोणतेच अनुदान मिळत नाही त्यामुळे शेतकर्‍यांना स्वखर्चातुन ते शेततळे पूर्ण करावे लागेल तालुक्यात अपूर्ण शेततळ्याची संख्या लक्षात घेता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून अपूर्ण शेततळे पूर्ण कसे करता येतील यासाठी प्रयत्न करू
– प्रशांत देसाई,सहाय्यक कृषी अधिकारी अमळनेर