एरंडोल । कृषी मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कर्जाचा बोजा वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.त्यामुळे शेतकर्यांना त्वरित कर्जमुक्ती देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार चिमणराव पाटील व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी तहसिलदार सुनीता जर्हाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकर्यांची कर्जमाफी झाली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या वतीने तालुक्यात भगव्या सप्ताहास सुरुवात करण्यात आलीफ असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या समस्या सोडविण्याच्या मागण्या
शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांना शासनाने सहकार्य करण्याची गरज आहे. कृषीसाठी चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा, वीजबिल माफ करण्यात यावे,ठिंबक संचाचे अनुदान त्वरित देण्यात यावे, पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, कापसाला सात हजार रुपये भाव देण्यात यावा, भूमिहीन व वृद्ध शेतकर्यांना निवृत्तीवेतन योजना सुरु करण्यात यावी, कापसाच्या बी.टी.659 बियांयावरील बंदी उठविण्यात यावी, सर्व बँकांनी कृषी कर्ज रोखीने द्यावे, एटीएम मध्ये नियमित रक्कम उपलब्ध करून दयावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शेतकर्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या असून त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, शासनाने निवेदनातील समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी यांची होती उपस्थिती
माजी आमदार चिमणराव पाटील, अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, वैशाली गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, सभापती रजनी सोनवणे, उपसभापती विवेक पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका संघटक सुनील मानुधाने, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, शहर प्रमुख प्रसाद दंडवते, जळूचे सरपंच रवींद्र जाधव, नगरसेविका हर्षाली महाजन, दर्शना ठाकूर, कल्पना महाजन, प्रतिभा पाटील, आरती महाजन, महेश पांडे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.