शहादा। शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे यासह विविध मागण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दोडाईचा रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांच्या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर काही भागात आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परंतु, शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्या नेतृत्व आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. शेतकर्यांचा मालाला ठोस हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकर्यांना विज बिल माफ झाले पाहिजे. त्यांना मोफत विज मिळाली पाहिजे आदी मागण्या शेतकर्यांच्या आहेत.
शासनाच्या विरोधातील घोषणांनी दणाणला परिसर
शेतकर्यांची पिळवणूक थांबवली पाहिजे यासह विविध मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दोंडाईच्या रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्तारोको आंदोलनात जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी. तालुकाध्यक्ष वसंत पाटील, नथ्थु रोहिदास पाटील, गणेश मंगेश पाटील, गिरधर पाटील, राजेंद्र पाटील, जगदिश पाटील, अंबालाल पाटील, लक्ष्मण पाटील, रमेश पाटील आदि पदाधिकारीसह मामाचे मोहिदा, भादा, आवगे,लोनखेडा, कुढावद, गोगापुर,आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी कोणाताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.