शेतकर्‍यांना दिलासा ; हरिपूरा धरणातून सुटले पाणी

0
यावल:- सातपूडा पर्वतरांगेतील हरीपूरा धरणातून हडकाई नदीतून शनिवार, 10 रोजी दुपारी 12 वाजता सावदा स्वामीनारायण गुरुकलचे भक्तीस्वरूपदासजी भंडारी स्वामी, भुसावळ लघू पाटबंधारे विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एम महाजन यांच्या हस्ते पाणीपूजन करून नदीत पाणी सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. हरीपूरा, मोहराळा, कोरपावली, महेलखेडी परीसरात पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकरीवर्गाने जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, प्राध्यापक आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे याबाबत आग्रह धरला होता.