वरखेडे। संगणीकरण सातबारा उतार्यांचे काम पूर्ण झाले. संगणीकरण उतारा शेतकर्यांना देण्याचा क्रांतीकारक निर्णय असून पूर्वीचा उतारा आणि संगणीकरण केलेला उतारा यांच्यातील माहिती योग्य आहे किंवा नाही यांची खात्री शेतकर्यांनी करून घ्यावी, असे प्रतिपादन वरखेडे गावात चावडीवाचन कार्यक्रमात अप्पर तहसिलदार ज्योती देवरे यांनी व्यक्त केले. धुळे तालुक्यातील वरखेडे गावातील गोडावून चौकात अप्पर तहसिलदार ज्योती देवरे, निवासी नायब तहसिलदार मिलींद वाघ, फागण्याचे मंडळ अधिकारी कैलास बोरसे, धुळे शहराचे तलाठी वाय.आर.पाटील, अव्वल कारकून दिलीप सूर्यवंशी , नावराचे तलाठी चंद्रकिरण साळवे, वरखेड्यांचे प्रभारी तलाठी छाया काळे, सरपंच विलास धनगर, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर मराठे, संदीप गुजर, जिजाबाई निकम, देवराम माळी, राजेंद्र चौधरी, लोटन माळी, ग्रामसेवक एस.बी.वाघ, आदींच्या प्रमुख उपस्थितीत संगणीकरण उतार्यांचे चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोप्या भाषेत दिली माहिती
चावडी वाचन कार्यक्रमात अप्पर तहसिलदार ज्योती देवरे यांनी शेतकर्यांना समजेल अशा शब्दात उदाहरणासह माहिती दिली. महिलांना समाज प्रवाहात येण्यासाठी पुरूषांनी पुढाकार घेणे महत्वाचे असल्याचे सांगून परिसारतील लोकांनी सातबारा उतार्यांची माहिती देणे गरजेचे आहे. कारण काही संकट आल्यास घरातील महिलेला कोणतीच माहिती देता येत नसल्यांचे चित्र अनेक ठिकाणी निदर्शनास आल्याचे सांगितले. पुर्वीचा उतार्यातील आणि संगणीकरण उतार्यातील माहितीमध्ये काही तफावत असल्याचे आढळून आल्यास शेतकर्यांनी गोंधळून जावू नये, असेही देवरे यांनी सांगितले.
7/12 उतारा मिळणार संगणीकृत
शेतकरी बांधवांना तलाठीमार्फत लेखी स्वरूपात सातबारा उतारा देण्यात येत होता. मात्र आता सदरचा उतारा संगणीकरणकृत मिळणार आहे. त्यामुळे पुर्वीचा उतारा आणि आताच्या संगणीकरण उतारा यांच्यातील माहिती योग्य आहे किंवा नाही यांची शेतकर्यांनी कल्पना व्हावी यासाठी चावडी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात येत असून त्याचा शुभारंभ वरखेडे (ता.धुळे) गावात झाला.
यांची होती उपस्थिती
चावडी वाचन कार्यक्रमप्रसंगी शांताराम माळी, रवींद्र गुजर, जयराम गुजर, लोकेश पाटील, दगउू पाटील, भाईदास पाटील, सुनिल जाधव, मोगल पिंजारी, निंबा भदाणे, नामदेव माळी, विलास पटेल, महेंद्र गुजर, रमेश पाटील, लोटन पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र भदाणे, शिवदास चौधरी, रामदास पाटील, आबा कोळी, रामदास माळी आदी शेतकरी बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.