शेतकर्‍यांनी कमी पाण्यात फायद्याची शेती करणे शिकावे

0

बोदवड । आपल्या शेतात उभे असलेले पीक हे शेतकर्‍यांशी बोलते. त्याच्या बोलण्याची भाषा मात्र शेतकर्‍याला समजली पाहिजे. शेतकर्‍यांनी गरजेपुरते धान्य उत्पादन करावे. स्वतः मार्केटिंग करावी, सध्या अनेक कंपन्या आपल्या पाण्याचा पैसा करतात. शेतकर्‍याने स्वतःच्या मालाचा पैसा का करु नये. कमी पाण्यात चांगले पीक घ्यावे. कमी खर्चातून फायद्याची शेती करावी, असे आवाहन प्रगतशिल शेतकरी विकास कोटेचा यांनी केले. शेलवड येथे पीक पाहणी कार्यक्रम चर्चासत्रात प्रत्यक्ष शेेतकर्‍यांशी संवाद साधतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेलवडचे प्रगतशिल शेतकरी डॉ. कांतीलाल बरडिया होते.

यांची होती उपस्थिती
मका पाहणी चर्चासत्रात सुरवाडा येथील प्रकाश पाटील, चिखली येथील भानुदास सोनवणे, शेलवड येथील रमेश चौधरी, जलचक्र बु. येथील गजानन पाटील, महेंद्र पाटील यांसह अनेक शेतकर्‍यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शेलवड रघुवीर व्यायाम शाळेचे व्यवस्थापक राकेश बोरसे, उपसरपंच निलेश माळी, रमेश बोदडे, रमेश चौधरी, सुपडू भिल, तुकाराम नांदेडे, सुभाष वाणी, माजी सैनिक रविंद्र पाटील उपस्थित होते.

तालुक्यातील शेतकर्‍यांची उपस्थिती
रवी 81 मका प्रत्यक्ष पीक पाहणीसाठी शेलवड, मुक्तळ, वराड, जलचक्र बु., जलचक्र खुर्द, सुरवाडा बु., सुरवाडा खुर्द, येवती, रेवती, जामठी, देवळसगाव, चिखली, बोदवड, पळासखेडे बु., मनुर खुर्द, मनुर बु., साळशिंगी यांसह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विकास कृषी केंद्र, विकास हायटेक कृषी एजन्सी यांनी केले होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केले. पीक पाहणी कार्यक्रमात 800 शेतकर्‍यांनी भेटी दिल्या. आभार विकास कोटेचा यांनी मानले.