शेतकर्‍यांनी केलेल्या धूळपेरण्या संकटात

0

बोरद । दि. 3 जुन रोजी जिल्ह्यात व परिसरात सर्वत्र पाऊस बरसला.परंतु दोन आठवडा होऊन ही परिसरात पावसाची दमदार हजेरी दिसून येत नाही. जून संपत आला मृग नक्षत्र ही कोरडेच बळीराजा हवालदिल, सुलतानीने होरपळलेल्या बळीराजा आस्मानाकडे डोळे लावून बसलाय काहिनी धूळ पेरण्या केल्या आहेत.काहि शेतकर्‍यांच्या कुंपननलिका असूनही शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध नाही.त्यात विजेचा लपणडावाने मेटाकुटिस आला आहे.तर काही शेतकर्‍यांना तर आपल्या शेतात चुहा पद्धतीने पाणी देऊन पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

खरिप हंगामाची तरारी पूर्ण
शेतीसाठी पूरक पाणी मिळावे यासाठी शेतकरी दमदार पावसाची वाट पहावी लागत आहे.सर्वत्र पहिला पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल हा जसा ऊन सावल्यांचा खेळ रंगतांना दिसतोय. तळोदा तालुका व परिसरात सध्या ऊस,कापुस,भुइमुंग,पपई,ज्वारी,बाजरी,भाजीपाला आदि पिकांच्या पेरण्या जास्त आहेत.ज्या शेतकर्‍यांचा कुपं ननलिका आहेत त्या शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली आहे. तर सामान्य नागरिक उकाड्याने बेजार झाला आहे.तर बाजारात चैतन्य येण्यासाठी दमदार पावसाची शेतकरी,व्यापारी,सर्व सामान्य जनमन आतुरतेने वाट पाहत आहेत.

ग्रामीण भागात पाणीटंचाई
सर्व क्षेत्रतील लोकांसाठी पाऊस हां जीवनदायी आहे.वरुण राजा च्या स्वागतासाठी सारेच उत्सुक आहेत.खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असुन शेतकर्‍यांना पावसाची वाट पहावी लागत आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकर्‍यांनी शेतीसाठी लागणारे शेती अवजारे खरेदी करुण ठेवली आहेत.गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ग्रामीण भागाकडे पाणी टंचाई जाणवू लागली आहे.अणि अशातच पावसाने दिरंगाई केल्याने पाणी टंचाई भासत आहे.