धानोरा । येथून जवळ असलेल्या देवगाव परिसरासह व खान्देशातील प्रगतिशील शेतकर्यांनी अजित सिड्सकडून शिवारफेरी अंतर्गत शेती विषयक नवनविन तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत होण्यासाठी नुकतेच दोन दिवसीय शिवारफेरी कार्यशाळा औरंगाबाद जिल्हातील इमामपुर, गंगापुर येथे आयोजित करण्यात आली होती. शेतकर्यांनां आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे, त्यांचे भरघोस उत्पन्न कशा प्रकारे वाढेल याकरिता अजित सिड्स यांनी त्यांच्या स्वखर्चाने उभारलेल्या विविध जातीच्या पिकांची माहिती शेतकर्यांनां मिळाली. यामध्ये नवीन संशोधित केलेल्या भाजीपालामध्ये पत्ता कोबी, मुळा, कांदा, टमाटे, दुधी भोपळा, वांगे, कारले, दोडके, मिरची, भेंडी, कोशिबिर, वर्षभर येणारे काही पिके तसेच मका संकरीत गव्हाचे वाण, बाजरी, दादर, सुर्यफुल, मोहरी तर कापसाच्या विविध प्रकारच्या जाती कशा प्रकारे निरिक्षण अनुमान तंत्रज्ञानाचा प्रयोगशाळेत विकसित करून शेतकर्यांनी कशा प्रकारे भरघोस उत्पन्न घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
तज्ज्ञ कृषी अधिकार्यांनी केले मार्गदर्शन
प्रत्येक पिकांची घ्यावयाची काळजी त्याला गरजेनुसार खत, फवारणी, पाणी व्यवस्थापन, निगा कशा प्रकारे राखावी तसेच कापसाच्या बोंडअळीबाबत शेतकर्यांना चित्ररथाद्वारे जनजागृती व सखोल मार्गदर्शन तज्ञांनी केले. तर खान्देशचे मुख्य पिक केळी (टिश्युकल्चर) या पिकाचे प्रयोग शाळेत सुक्ष्म संशोधनाद्वारे निर्मित सुदृढ व निरोगी रोपे कसे तयार करावे लागतात याची माहिती व प्रात्यक्षिक तंत्रज्ञान दाखविण्यात आले. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेली शेती पाहुन शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. धानोरा सह परिसरातील शेतकरी राजेंद्र चौधरी, निवृत्ती खैरनार, अनिल महाले, संजय महाजन, युवराज मोरे, विजय पाटील, जितेंद्र महाजन, रविंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. श्रीराम पाटील व खान्देशातील शेतकरी उपस्थित होते.
प्रगतिशील शेतकर्यांचा केला सत्कार
यावेळी शेतकरी व कृषी क्षेत्रातील तज्ञ याच्यात शेती व बि बियाणे बाबत, तसेच शेतकर्यांच्या अडीअडचणींचे निरसन केले. याप्रसंगी अजित सिडसचे व्यवस्थापक समीरभैय्या मुळे, मार्केटींगचे रमेश वट्टमवार, भाजीपाला तज्ञ डॉ.सुरेंद्र देशमुख, कापूसचे डॉ.प्रदीप मोरे, केळीतज्ञ डॉ.आनंद जाधव, राम जांगीर, विभागीय व्यवस्थापक सुनिल मुळे, विक्रम पाटील तर या शिवारफेरीत खांदेशातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुधीर मेहूण यांनी केले.