शहादा । तालुक्यातील अशिक्षित शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज किचकट असल्याने संभ्रमात असून शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने आता कर्ज माफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे फॅड काढले आहे. शेतकर्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागत आहे. अशिक्षित, अल्पशिक्षित शेतकरी वर्गास याचे ज्ञान नाही. त्यामुळे अर्ज भरतांना काही शेतकरींना आर्थिक भुदंडही बसत आहे. तसेच सर्वर डाऊन, साईट हँग होणे आदी समस्या आहेत. सद्या शेतीची कामे सुरू आहेत. शेतकरींना आपली कामे सोडून ऑनलाईन केंद्रावर अर्ज भरण्यासाठी हेलपट्या माराव्या लागत आहे. एका बाजूला निसर्गाचे संकट आणि हे शासनाचे ऑनलाईन अर्ज अशा द्विधा कचाट्यात शेतकरी सापडला आहे. जर ऑनलाईन अर्ज भरायचा होता. तर प्रत्येक गावाला तलाठी असतात त्यांनी गावागावातच हे काम केल असते तर शेतकरीचा वेळ व पैसाही वाचला असता अशा प्रतिक्रिया अशिक्षित शेतकर्यांच्या उमटत आहेत. म्हणून शासनाने या समस्यांवर मार्ग काढावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, शहादा येथील स्टेट बँक शाखेत 245 शेतकर्यांनी अर्ज भरून दिले आहेत.
जनजागृतीअभावी शेतकर्यांमध्ये निरूत्साह
नवापूर । रविवार असून देखील पिक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी स्टँट बँक, डी. डी. सी. बँक,युनियन बँक,महाराष्ट्र बँक या नँशनलाईज बँका सुरु ठेवण्यात आल्या होत्या. पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत 31 जुलै असल्याने परिसरातील शेतकरी गर्दी करतील असे वाट असतांना मात्र नवापूर शहरातील बँकामध्ये सन्नाटा दिसुन आला. बँक मँनेजरसह कर्मचारी शेतकर्यांची वाट पाहत बसुन होते. नवापुर शहर व तालुक्यातील शेतकर्यांची पिक विम्यासाठी अर्ज भरण्याची संख्या फारच कमी दिसुन आली. शेवटच्या दिवशी ना धावपळ दिसुन आली ना उत्साह होता. आज पावसाने पण विश्रांती घेतली होती. चार वाजेला बँकेत जाऊन आकडेवारी घेतली असता स्टँट बँक शाखेत सुमारे 100 ते 150 शेतकर्यांनी अर्ज भरून दिला होता. तर महाराष्ट्र बँकेत ज्यांनी कर्ज घेतले होते अशा 70 शेतकर्यांनी पीक विमा अर्ज भरला आहे. तर डी डी बँक व युनियन बँकेत एक ही अर्ज आलेला नव्हता. बँक कर्मचारी सकाळ पासुन बँक सुरु करुन वाट पाहत होते. पीक कर्ज दिले आहेत त्यांचेच अर्ज आले आहेत. मात्र ज्यांची शेती आहे त्यांनीही पीक कर्ज विम्यासाठी अर्ज केले पाहीजे होते. मात्र तसेच काही दिसुन आले नाही. असे का झाले पीक कर्जाबाबत कृषी अधिकारी तसेच तलाठी यांनी गाव शहर पातळी पातळीवर प्रचार प्रसार केला नाही की शेतकर्यांन मध्येच उदासिनता आहे की ते अनभिज्ञता होती असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
उदासिनता का…?
ज्यांची शेती आहे त्यांनी कर्ज घेतले नाही अशा शेतकर्यांनी सुध्दा पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. मात्र तसे अर्जच आले नसल्याचे बँक अधिकार्यांनी बोलतांना सांगितले. याबाबत शेतकर्यांमध्ये पीक कर्ज विमा बाबत किती व काय प्रचार व मार्गदर्शन झाले हा संशोधनाचा विषय आहे
अशी आहे योजना
खरीप हंगाम 2017-18 करिता जिल्हात पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे शेतकर्यांना नैसगिक आपत्तीचा सामना करावा लागतो पुर,चक्रीवादळ,गारपीठ,अतिवृष्टी सारख्या नैसगिक आपत्ती मुळे पेरणी झा़लेल्या पीकांचे किंवा काढणी पश्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होणे शेतकर्यांचा फायद्याचे आहे या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे.