रोटरी क्लबतर्फे गाळ काढण्याचा उपक्रम
पिंपरी : शेतीला भरमसाठ पाणी व रासायनिक खतांचा वापर शेतकर्यांनी केला तर जमिन नापीक होईल असे मत अॅग्रोनॉमिस्ट व फिनोलेक्स (उर्से) कंपनीचे उप महाव्यवस्थापक विठ्ठल गोरे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, पिंपरी, सिनर्जी, गणेशखिंड, सारसबाग या पाच रोटरी क्लबच्यावतीने व रोटरीक्लब कोलंबीया यांच्या सहकार्याने संयुक्त प्रकल्प अभियानात चांदखेड येथील ओढयातील गाळ काढण्याचा उपक्रम गेल्या वर्षी हाती घेतला. यावर्षी ओढयात व परीसरातील विहीरींना पाणी साठा वाढला असून त्या निमित्ताने रविवारी चांदखेड येथे शेतकर्यांसाठी ठिबक सिंचनावर विविध पिकाची लागवड पाणी व्यवस्थापनाचे फायदे व तोटे व शासकीय सवलतीबाबत गोरे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचे प्रकल्प अध्यक्ष अॅड. विजय शहा, प्रमोद बेंद्रे, प्रकाश कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र पारसनीस, रमण खिंवसरा, चांदखेड रोटरी ग्रामसभेचे अध्यक्ष सचिन गायकवाड, उपसरपंच पौरस बारमुख, शेती प्रकल्पाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पाण्याच्या व्यवस्थापनाची गरज
शेतकर्यांना मार्गदर्शन करताना गोरे पुढे म्हणाले की, फिनोलेक्सच्या पीयूसी पाईपमुळे देशभरातील अनेक क्षेत्र ओलीताखाली आली. बागायती क्षेत्र निर्माण झाले. शेतकर्यांचे उत्पन्न वाढले. पाण्याचे महत्व अत्यंत आहे. जलसंधारण क्षेत्रातून निर्माण झालेले पाण्याचा वापर ठिबक सिंचनातूनच झाले पाहीजे तसे परिपत्रक देखील 2015 साली सरकारने काढले. दुर्देवाने शेतकरी वापर करीत नाही. शेतकर्यांना नदीचे पाणी उचलण्याची परवानगी आहे परंतू ठिबक सिंचनानुसार त्याचा वापर शेती उत्पादनासाठी केला पाहीजे. आपण पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहोत याची जाणीव प्रत्येकानी ठेवली पाहीजे. आपल्या गावातील पाण्याचे व्यवस्थापन करणे काळाचीच गरज आहे. प्रत्येक पाण्याचा थेंब पिकासाठी उपयोगी व्हावा पाणी वाया जावू नये हा प्रशिक्षणामागील हेतू आहे.
ओढयातील पाणीसाठा वाढला
रोटरी क्लबमुळे ओढयातील पाणीसाठा वाढला. विहिरींना पाणी वाढले परंतू शेतीला पारंपारीक पध्दतीने पाटाद्वारे पाणी न देता ठिबक सिंचनाद्वारे दिले तर वेळ, पैसा वाचेल, जमिनीचा कस कायम राहील. तुमच्या भावी पिढीला शेतीतून चांगले पिक घेता येईल. सरकारच्या अनेक सबसिडी योजना आहेत, त्याचा फायदा प्रत्येक शेतकर्यांनी घेतला पाहिजे असेही गोरे यांनी सांगितले. प्रकल्प अध्यक्ष अॅड. शहा यांनी प्रास्ताविक केले. मुक्त कंठाने आभार मानले. यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले.