शेतकर्‍याच्या शेतातून 45 हजारांचा कापूस लांबवला ; पोलिसात तक्रार

0

यावल- अज्ञात चोरट्यांनी शहरातील शेतकर्‍याच्या शेतातून सुमारे 45 हजारांचा कापूस चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी उघडकीस आली तर रविवारी या बाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. शहरातील शेतकरी प्रकाश केशव महाजन यांचेे फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या मागील बाजुस शेत गट क्रमांक 759 आहे असून या शेतात त्यांनी खरीपाचा कापूस लावला होता. हंमागात पाऊस चांगला न झाल्याने मुळातच त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तेव्हा उशिराने बोंड फुटले तर शनीवारी जेव्हा ते शेतात गेले तेव्हा मोठ्या प्रमाणावर शेतातून कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी थेट कापूस वेचुन चोरी केल्याचे निर्दशनास आले. तेव्हा त्यांनी या बाबत पीक सरंक्षण सोसायटीकडे तक्रार केली. शनिवारी सांयकाळी काशिनाथ फेगडे व राकेश करांडे यांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला. त्यात सुमारे 45 हजारांचा कापूस वेचुन चोरून नेल्याचे समोर आले आहे तर रविवारी यावल पोलिसात महाजन यांनी तक्रार दिली आहे.