शेतकर्‍यावर सहकुटुंब आत्महत्येची वेळ

0

इंदापूर (सुधाकर बोराटे) । प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील मौजे शेळगाव वैदुवाडीते भरणेवाडी, पोरेवाडी राज्य मार्ग क्र.124 या रस्त्याचे साडेपाच किमी इतक्या लांबीचे काम इंदापूर येथील जे. के. जगताप अँड कंपनीला देण्यात आले आहे. नकाशातील जुना रस्ता मार्ग सोडून गट नंबर 1181 मधील शेतकरी नानासो निवृृृत्ती पोरे यांचे शेतीतील 400 डाळिंबाची झाडे व 10 गुंठ्यातील ऊस पिक तोडू न टाकला. दंडेलशाहीने त्यांचेच शेतातील लगतचा मुरूम रस्त्यासाठी वापरला आहे. तत्पुर्वी या शेतकर्‍यास कसलीही पूर्व सूचना किंवा त्याची जमीन संपादीत करण्यात येत असलेबद्दलची नोटीस जमीन बळकावुन रस्ता काम चालू केलेले आहे. त्यामुळे या शेतकर्‍यावर सहकुटुंब आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

या रस्त्यापैकी अडीच किमी काम पूर्ण झाले असून त्या पुढील मार्गातील काही शेतकर्‍यांनी काम करण्यास हरकत घेतली आहे. तर काही शेतकर्‍यांनी गट नंबर 1192मधे जुन्या पाऊल वाटांवर अतिक्रमणे करून जागा बळकावुन त्या जागेत घरे बांधलेली आहेत. ही घरे बांधणारे हे तालुक्यातील मोठ्या नेत्यांचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांची रस्त्यात गेलेली घरे वाचविण्यासाठी राजकीय बळाचा वापर करून शासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारास हाताशी धरून या नेत्याने गट नंबर 1181 मधून रस्ता तयार करण्याचा घाट घातला व अधीकार्‍यांना हाताशी धरून कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना उपअभियंता गट क्र.1प्रधानमंत्री ग्रामसडक योजना इंदापूर. व जे.के.अँड कंपनीला निविदेतील अंदाजपत्रकीय दरापेक्षा 4.95 टक्के जादा दराने काम देण्यात आलेले आहे.

जे.के.जगताप यांचे सब ठेकेदार जाधव व भरणेवाडी ग्रामपंचायत माजी सदस्य दत्तु दामु पोरे यांनी शेतकरी व त्याची पत्नी लंकाबाई, आई लक्ष्मीबाई व मुलगा अनिल यांना शिविगाळ करून दमदाटी करून त्याना रस्ता काम अडविल्यास जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पोरे यांनी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे. परंतु तक्रारीवर अद्याप कसलाच न्याय मिळत नसल्याने ठेकेदार व अधीकारी याचें दंडेलशाहीला शेतकरी कुंटुंब पुरते घाबरुन भयबीत झाले असुन दि. 12 जानेवारी रोजी संबंधीतावर कारवाई होउन न्याय मिळणेबाबतचे दुसरे निवेदन तहसिलदार यांना सादर केले असून न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव सहकुटुंब दि.26 जानेवारी तहसील कार्यालय इंदापुर या ठीकाणी आत्मदहन करणार असल्याचे निवेदणात नमुद करण्यात आलेले.

सरपंचाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
बेकायदेशीर रस्ता कामा बाबत भरणेवाडी ग्रामपंचायत सरपंच यांनी नानासो निवृत्ती पोरे यांना लेखी टपाल देऊन वैदवाडी ते कळस जोड रस्ता काम अंतीम टप्यात असून सदर गटाची मोजनी झाल्यास नानासो पोरे यांना सदर रस्त्यासाठी गेलेले क्षेत्र कमी पडल्यास ते क्षेत्र सर्व शेतकरी व ग्रामपंचायत सदर क्षेत्र काढून देण्यास जबाबदार राहील अशा प्रकारे पदाचा दुरूपयोग करून ग्रामविकास अधिकार्याला विश्‍वासात न घेता बेकायदेशीर दाखला स्वत:च्या सहीने दिलेला असल्याने सरपंचाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.