मुंबई-देशातले आणि राज्यातले शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. अशात या शेतकऱ्यांबाबत अभिनेत्री रविना टंडनने एक वादग्रस्त ट्विट केले आहे. आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका असे ट्विट अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. आंदोलन करताना शेतकरी शेतमालाची नासाडी करतात, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते त्यामुळे तातडीने आंदोलक शेतकऱ्यांना अटक केले जावे आणि त्यांना जामीनही दिला जाऊ नये असे रविना टंडनने ट्विट करून म्हटले आहे. हा ट्विट रविना टंडनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आहे.
What a sad thing to happen . Terrible way to protest. Any harm to public property,transport or commodities,should be instantly arrested and jailed without bail . https://t.co/kDcIg1zP5h
— Raveena Tandon (@TandonRaveena) June 3, 2018