शेतकऱ्यांना दिलासा: राज्य शासन करणार दररोज दहा लाख लिटर दुधाची खरेदी

0

मुंबई: जगभरात कोरोनाचे संकट असल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सर्वच घटकाला कोरोनाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात दूध उत्पादन होत असते,मात्र कोरोनामुळे मागणी घटली असल्याने लाखो लिटर दुध खरेदीविना पडून आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 रुपये दराने राज्य शासन दूध खरेदी करणार आहे. येत्या चार ते पाच दिवसात खरेदी केंद्राला सुरुवात होणार असून पुढील दोन महिने खरेदी केली जाणार आहे. राज्याचेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.