चाळीसगाव-पशुवैद्यकीय दवाखाना पातोंडा येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मका व ज्वारीच्या वैरण बियाण्याचे वाटप पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, पातों डा सरपंच आधार माळी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातुन चारा बियाणे मागणीसाठी ६८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पातोंडा येथील २६१ अर्ज प्राप्त होते. त्या सर्व लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर ९५२ किलो ज्वारी व ५०० किलो मक्याचे बियाणे वाटप करण्यात आले.
पुण्यश्लोक अहील्याबाई होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ बिलाखेड यांच्यामार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने अंतर्गत मुंदखेडा खु. येथे संपुर्णा गिनी ग्रासचे ५००० ठोंबै व जिल्हा वार्षीक योजनेतुन १०००ठोंबांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागात दुष्काळाची तिव्रता कमी करण्यासाठी व भविष्यात जनावरांना चारा व पाणी टंचाई जाणऊ नये म्हणुन शासनस्तरावर तातडीने उपाययोजना केल्या जात आहे. त्यात पशुसंवर्धन खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आमदार उन्मेश पाटील, तहसीलदार कैलास देवरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहे.
सदर चारा बियाण्यांचे वाटप पातोंडा, ओझर, बोरखेडा खु., मुंदखेडा खु., मूंदखेडा बु. ,चांभार्डी बु. चांभार्डी खु.,एकलहरै, भामरे बु., भामरे खु. या गांवातील शेतकर्यांना वाटण्यात आले.
सदर शेतकरी स्वताहाच्या शेतात चारा पिकऊन आपआपल्या जनावरांना पुरेल एवढा चारा ठेऊन बाकी चारा गरजु शेतकर्यांना देणार आहे
उपसभापती संजय पाटील, पातोंडा सरपंच आधार माळी, देविदास माळी, सच्चीदानंद जाधव, पंडीत पाटील, विकास पाटील, रघुनाथ माळी, बालाभाऊ जोशी यांच्यासह तालुका पशुअधिकारी, डॉ.बडगुजर, अरुण माळी, डॉ.चंद्रकांत हलगे आदी उपस्थित होते.