शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले तूर, साखर अन् दूध!

0
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा भाग म्हणून तूर, साखर आणि दूध तहसीलदारांकडे सोपवून राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे साहित्य पोहोचते करा, असे निवेदन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिले आहे.
शेतकरी अडचणीत असताना सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. उलट शेतकरीविरोधी धोरण सरकार राबवित असल्यामुळे शेतकऱ्यांनी १ जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून परभणी, अहमदनगर, औरंगाबाद यासह मराठवाडा राज्यातील अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तूर, साखर आणि दूधाचे पाकीट भेट देण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मूठभर तूर, साखर आणि दूध पिशवी तहसीलदार यांना देण्यात आली.