प्रशासनाची झोप उघडली : आश्वासनानंतर दिड तासांनी आंदोलन मागे
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, नरडाणा परिसरातील काही शेतकर्यांनी मंगळवारी सकाळी साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान गोराणे, नरडाणा परीसरात असलेल्या आणि होव घातलेल्या एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने या शेतकर्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच कुंभकर्णी प्रशासन खडबडून जागे झालं. प्रशासनाच्या आश्वासनानंतर दीड तास चालेलं आंदोलन अखेर आंदोलक शेतकर्यांनी मागे घेतलं. शरद भटू पाटील या शेतक-यांसह गोराणे, नरडाणा परिसरातील काही शेतकरी मोबाईल टॉवर वर चढले. यानंतर घटनास्थळी शिंदखेडा येथील तहसीलदार सुदाम महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलक शेतकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आंदोलक शेतकर्यांना लेखी आश्वासन दिलं. यानंतर शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतलं. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने शेतकर्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच प्रशासन खडबडून जागे झालं.