वढोदा वनपरीक्षेत्रातील घटना ; जिल्हा रुग्णालयात उपचार
मुक्ताईनगर :- तालुक्यातील वढोदा वनपरीक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर 517 जवळील सुकळी शिवारातील शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरावर वाघाने हल्ला केला. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली. संतोष उन्हाळे यांच्या शेतात पिंप्री अकराऊत येथील शेतमजूर प्रदीप दिलीप सोनवणे (19) व दिलीप गरबड सोनवणे (60) हे दोघे बाप लेक आजुबाजूच्या शेतात मजुरीचे काम करीत होते.
याचवेळी प्रदीप सोनवणे यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. यात प्रदीपच्या उजव्या हाताला वाघांच्या दातांनी खोलवर जखम झाल्यामुळे अतिरीक्त रक्तश्राव झाला. आजबाजूच्या शेतकर्यांसह वनपाल विजय फणसे यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ.पंकज पाटील यांनी प्रथमोपचार केले. प्रदीप यास अधिक उपचारार्थ जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.