शेतातील केबल चोरी करणारे भुरटे चोर ताब्यात

0

भुसावळ । तालुक्यातील वांजोळा शिवारात शेतातील विहीरीवरील केबल चारी करुन त्यातील धातूची विक्री करणार्‍या दोन भुरट्या चोरट्यांना शेतकर्‍याच्या सतर्कतेमुळे पकडण्यास यश आले असून पोलीसांनी चोरी झालेल्या केबल वायरसह या दोघांना ताब्यात घेतले आहे.

केबल जाळताना पकडली चोरी
वांजोळा शेती शिवारात विहीरीवरील कॉपर केबल चोरी करुन त्याची धातूचे तार विक्री करणार्‍या भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. शुक्रवार 30 रोजी पहाटे 6 वाजेपूर्वी कालसिंग दगडू गायकवाड, जितू सोमा अहिरे (दोघे रा. वांजोळा) यांनी तानाजी शांताराम पाटील (रा. राजेशनगर, रिंगरोड, भुसावळ) यांचे वांजोळा शिवारात शेत आहे. या शेतातील 6 एमएमची 30 फुट वायर या चोरट्यांनी लंपास केली. पाटील हे सकाळी शेतात गेले असता त्यांना वायर चोरीस गेले असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी मिळालेल्या माहितीवरुन कालसिंग गायकवाड याचे घर गाठले असता दोघे आरोपी घरामागे चोरी केलेली वायर जाळत असल्याचे आढळून आले. पाटील यांनी लागलीच पोलीसांना कळवून चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.