शेतातील विहिरीतून इलेक्ट्रिक मोटार लांबवली

0

धुळे- शेतातील विहिरीत लावलेली इलेक्ट्रिक मोटार लंपास झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील वरझडीत घडली. शेतकरी मधुकर गंगाजी बैसाणे (47) यांच्या मालकीचे गावालगत शेत असून विहिरीत पाण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार बसविण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी बैसाणे यांच्या शेतातील विहिरीत उतरून पाच हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेली. याबाबत मधुकर बैसाणे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला.