जळगाव : तालुक्यातील भोकर शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीचे ठिबक नळ्या चोरून नेल्या. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती साहित्याच्या चोर्या वाढल्या
दत्तात्रय नथू सोनवणे (54, रा.भोकर, ता.जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून त्यांचे भोकर शिवारात गट क्रमांक 376 मध्ये शेत आहे. त्या ठिकाणी त्यांनी 45 हजार रुपये किंमतीच्या 20 हजार मीटर लांबीच्या ठिबक नळ्या ठेवल्या होत्या. रविवार, 22 मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात ठेवलेले ठिबक नळ्या चोरुन नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीला आला. याबाबत दत्तात्रय सोनवणे यांनी रविवार, 22 मे रोजी दुपारी एक वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.