शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने तरुणाचा मृत्यू

A 24 Year Old Youth from Nadgaon Died Of Poisoning बोदवड : तालुक्यातील नाडगाव येथे शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने 24 वर्षीय युवकाचा मृत्यू ओढवला. ही घटना गुरुवारी घडली. संतोष ध्यानदेव बोरसे (धनगर) अये मयत युवकाचे नाव आहे.

विषबाधेने तरुणाचा मृत्यू
संतोष हा तरुण गुरुवारी दुपारी शेतात कपाशी पिकावर फवारणी करत असताना त्याच्या नाका-तोंडात विषारी औषध गेल्याने त्याला विषबाधा झाली व उलटी व मळमळ होऊ लागल्याने त्याला सरकारी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत निवृत्ती श्रीपद बोरसे (धनगर) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अय्युब तडवी करीत आहे.